Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्री अब्दुल सत्तार यांना उच्च न्यायालयाची नोटीस

मंत्री अब्दुल सत्तार यांना उच्च न्यायालयाची नोटीस



मुंबई : खरा पंचनामा

वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीनीचा ताबा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचे आदेश दिल्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना नोटीस बजावली आहे. यामुळे हिवाळी अधिवेनशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अब्दुल सत्तार यांचा जमीन घोटाळा गाजणार असल्याची चर्चा आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित कथित जमीन घोटाळ्याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार, वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीचं एक प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. 

योगेश खंडारे यांनी 37 एकर जमिनीचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून मागणी केली. पण स्थानिक दिवाणी न्यायालयासोबत जिल्हा न्यायालयानेही त्यांचे अपील फेटाळले. जिल्हा न्यायालयाने 1994 ला खंडारेंचा अपील फेटाळताना कडक शब्दांत ताशेरेही ओढले होते. खंडारेंचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना ते ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सरकारी जमीन हडपण्याचा त्यांचा इरादा असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. 

याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते श्याम देवळे आणि ऍड. संतोष पोफळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्या. सुनील शुक्रे आणि महेंद्र चांदवाणी यांच्या पीठापुढे ही सुनावणी झाली. सुनावणी वेळी न्यायालयाने म्हटले आहे की, तत्कालीन कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहीत असूनही सत्तारांनी हा निर्णय घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.