Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक ग्रामीणची अन सांगली शहरातील बार फुल्ल

निवडणूक ग्रामीणची अन सांगली शहरातील बार फुल्ल



सांगली : खरा पंचनामा

रविवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी शनिवारी आणि रविवारी ड्राय डे घोषित केले होते. रविवारी मतदान संपल्यानंतर सांगली शहरासह लगतच्या शहरातील बिअर बार फुल्ल असल्याचे चित्र होते.

रविवारी मोठया उत्स्फूर्तपणे ग्रामपंचयतीसाठी मतदान पार पडले. पण दोन दिवस ड्राय डे असल्याने कार्यकर्ते तुंबले होते. मतदान संपल्यावर मात्र या कार्यकर्त्यांनी नेत्यांना पटवून  जवळच्या शहरातील बार गाठले. तेथे श्रम परिहार करत आपले पॅनेलच कसे निवडून येणार याची चर्चा करत मदिरा आणि मांस यावर ताव मारताना दिसून आले.

सांगली शहरातील बहुतांशी बार, ढाबे गर्दीने फुलून गेले होते. बंधने झुगारून सांगलीतील कोल्हापूर रस्त्यावरील बार रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पण बंदोबस्त करून थकलेले(?) पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क प्रशासन याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.