Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जळगाव जिल्ह्यात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त : पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

जळगाव जिल्ह्यात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त : पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्तजळगाव : खरा पंचनामा

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने जळगाव जिल्ह्यातील पारोळाजवळ बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केला आहे. यावेळी सुमारे पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, बनावट दारू कारखानामागे काहीतरी मोठा राजकीय वरदहस्त असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिकच्या विभागीय भरारी पथकाचे निरीक्षकांच्या पथकाने शनिवारी मौजे पारोळा नगरपरिषद हद्यीतील धुळे- नागपुर महामार्गालगत पारोळा येथे असलेल्या पत्र्याच्या गोडावूनमध्ये छापा टाकुन बनावट मद्य तयार करणारा पावणे दोन कोटींचे साहित्य जप्त करून कारखाना उध्दवस्त केला.

या कारवाईत रॉकेट देशी दारु संत्रा ब्रँडचे ३७,२०० बनावट पत्री बुचे, देशी दारु दारु टँगो पंचचे ४००० बनावट पत्री बुचे, रॉकेट देशी दारु संत्रा ब्रँडचे १,५५,५०० बनावट कागदी लेबल, देशी दारु दारु टँगो पंचचे ६०,००० बनावट कागदी लेबल, एक आर. ओ मशीन, ९० मि.ली क्षमतेच्या २४, २२० रिकाम्या बाटल्या. ८०० लिटर द्रावण, ड्रम स्पिरीट वासाचे, रबरी नळी, पाण्याचे माटर, २०० लिटर क्षमतेच्या २४ प्लास्टिक केन आदि मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, नाशिकचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जळगावचे अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.