Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तर फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत : भाजप नेत्याचा इशारा

तर फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत : भाजप नेत्याचा इशारा पंढरपूर : खरा पंचनामा 

महाराष्ट्रात येऊन खुद्द देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान देण्यात आलं आहे. फडणवीसजी, जास्त बोलाल तर तुम्ही उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असा इशारा एका मोठ्या भाजप नेत्यानेच दिला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. 

पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्यावर चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरमध्ये आले होते. पंढरपूर कॉरिडोर प्रकल्पावर बोलताना त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. पंढरपूर विकास आराखड्याला येथील स्थानिकांनी विरोध केला आहे. यावरून नागरिकांनी मुंबईत येऊन माझी भेट घेतली आणि या विषयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती, अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली. 

भाजपात असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या स्वामी यांनी आज पंढरपुरातही अनेक खळबळजनक वक्तव्य केली. कुणीही आड आलं तर पंढरपूरचं कॉरिडोअर होणारच, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. यालाच सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिलंय. 

यावर बोलताना स्वामी म्हणाले, मी म्हणतोय, हा विकास प्रकल्प होणार नाही. फडणवीस जास्त बोलतील तर ते उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. एवढी घाई कशासाठी आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विकास करायचाच असेल तर इथली चंद्रभागा नदी शुद्ध करा, इथे विमानतळ बांधा, एवढे लोक मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिर परिसराचा विकास करा. 

या कॉरिडोरवरून कुणाला नोटीसा पाठवणं हे चालणार नाही, असा इशाराही सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलाय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.