Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्न करून दागिन्यासह मुलींचा पोबारा

लग्न करून दागिन्यासह मुलींचा पोबारा



शिरोळ : खरा पंचनामा

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील युवकांशी लग्नाचा बनाव करून सोन्याच्या दागिन्यासह दोन नववधूनी पोबारा केला. याप्रकरणी विट्यातील एजंट महिलेसह 9 जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एजंट वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर) संध्या विजय सुपणेकर (रा. माळवाडी, ता. पलुस जि. सांगली), शारदा ज्ञानबा दवंड, ज्ञानबा रामचंद्र दवंड (रा.हडपसर ता. हवेली जि.पुणे), संतोष ज्ञानदेव सुतार (रा.मदनवाडी ता. इंदापुर), जगदीश बजरंग (पूर्ण नाव नाही, रा. खानापुर जि. सांगली), अर्चना सिध्देश्वर वाघमारे, रेखा सिध्देश्वर वाघमारे (रा. विश्रांतवाडी पुणे), सुवर्णा अमोल बागल (रा.भोसरी पुणे) अशी संशयितांची नावे आहेत.

सोन्याच्या दागिन्यासह साडेचार लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद अविनाश घारे, विकास मोगणे यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली आहे.

कुरुंदवाड येथील मोगणे-घारे गल्लीतील अविनाश घारे व विकास  मोगणे यांचा विवाह जमत नसल्याने संशयित एजंट वर्षा जाधव हिने मी लग्न जमावण्याचे काम करते. लोकांना मुली दाखवते माझा तो व्यवसाय असून त्या बदल्यात मला पैसे द्यावे लागतील असे तिने घारे आणि मोगणे कुटुंबीयांनी सांगितले होते.

एजंट जाधव आणि त्यांच्या 9 जणांच्या टोळीच्या मागणीनुसार दोन्ही कुटुंबीयांनी त्यांना पैसे दिले. दि. 31 ऑक्टोबर रोजी कुरुंदवाड येथे दोघांचे विवाह झाले. शारदा दवंड हिच्याशी अविनाश घारे याचे लग्न लावून देण्यासाठी 1लाख,80 हजार रुपये घेतले. मुलीला गंठण व अडीच तोळ्यांची सोन्याची दागिने लग्नावेळी घारे कुटुंबीयांनी घातली होते.लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशी दागिन्यासह मुलगी शारदा दवंड माहेरी गेली ते परत आलीच नाही.

विकास मोगणे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित वर्षा जाधवने अर्चना वाघमारे हिच्याशी लग्न लावून देण्यासाठी 1लाख, 60 हजार रुपये घेतले. मुलीला सोन्या चांदीचे मणीमंगळसूत्र, पैजण व जोडवी अशी 40 हजाराची दागिने घातले होते. दागिन्यासह 5 दिवसानी  मुलगी गेली ते परत आलीच नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.