Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसाला पोलिसांची मारहाण : नगरमधील घटना

पोलिसाला पोलिसांची मारहाण : नगरमधील घटना



अहमदनगर : खरा पंचनामा 

वरिष्ठांना खोटी माहिती देतो म्हणून रेल्वे पोलिसाला तीन पोलिसांनी बेदम मारहाण केली. यामध्ये रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख जखमी झाले आहेत. अहमदनगर रेल्वे पोलीस ठाण्यात ही घटना घडली. याप्रकरणी हवालदार मनोज साळवे, पोलीस नाईक हर्षल तोरणे, कॉन्स्टेबल जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र देशमुख लोहमार्ग पोलिस ठाणे अहमदनगर येथे सुमारे एक महिन्यापासून नेमणुकीस आहे. दि. 6 रोजी त्यांना रात्री नऊ ते दि. 7 रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत स्टेशन ड्युटी होती. त्यांच्यासोबत पोलिस कॉन्स्टेबल जगताप होते. तसेच पोलिस ठाणे अमलदार ड्युटीस पोलिस हवालदार मनोज साळवे व चालक ड्युटीस पोलिस नाईक हर्षल तोरणे होते. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास देखमुख पोलिस ठाण्यात असताना कॉन्स्टेबल जगताप याने काहीएक कारण नसताना देशमुख यांना, तू इथे येऊन माजलास का? असे म्हणून शिवीगाळ केली. त्यामुळे देशमुख हे त्यांच्या ड्युटीसाठी बाहेर निघाले. 

या मारहाणीत देशमुख यांच्या डाव्या हाताच्या बोटांना जखम होऊन रक्त आले व उजव्या हाताचे मनगट मोडले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तिघांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.