अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी
सांगली : खरा पंचनामा
लग्नाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. लखन सुधाकर देवकुळे (वय ३०, वरचे गल्ली, साठेनगर, तासगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 10 हजारांचा दंड वसूल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्याचा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी मंगळवारी दिला.
तासगाव मधील वरचे गल्लीतील साठेनगरमध्ये राहणारा लखन देवकुळे याने पिडीत मुलीला लग्नाचे अमीष दाखवून तिच्याशी जवळीक साधली होती. त्याने तिला रिक्षातून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर भिलवडी परिसरातही त्याने वारंवार हे कृत्य केले होते.
जुलै २०१७ मध्ये एके दिवशी पिडीत मुलगी घराला कुलुप लावण्यासाठी गेली होती. त्यावेळी देवकुळे याने दूचाकीवरुन येवून तिला लग्नाचे अमीष दाखवून पळवून नेले. या प्रकारानंतर पिडीतेच्या पालकांनी तासगाव पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी त्याच्याविरुध्द सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी प्रशांत कुंभार यांनी केला. सबळ पुराव्यांसह आरोपीविरुध्द खटला कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.
जिल्हा न्यायालयात विशेष न्यायाधीश श्री. हातरोटे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. अरितिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांचे सहकार्य लाभले. आठ साक्षीदारांच्या माध्यमातून कोर्टासमोर आलेला घटनाक्रम आणि आरोपीविरुध्द समोर आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने त्याला १० वर्षाच्या सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.