वाहतुकीचे नियम बालवयात अवगत होणे आवश्यक : डॉ. तेली
सांगली : खरा पंचनामा
वाहतुकीचे नियम हे विदयार्थ्यांना बालवयातच अवगत होणे आवश्यक आहे. ट्रॉफीक पार्कमध्ये वाहतुकविषयक नियमांसह सर्व माहिती अदययावत करणेत आली आहे, त्याचा लाभ विदयार्थी व नागरीकांना होणार आहे. जिल्हयातील शाळांनी वाहतुक विषयक नियमांची माहिती घेणेसाठी व सिग्नल प्रतिकृती, नियमांची माहिती असलेले दिशादर्शक आदेश देणारे प्रतिकृती, माहिती दर्शविणारे फलक इत्यादी पाहण्यासाठी पोलिस मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कला भेट द्यावी असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले.
पोलिस मुख्यालयात ट्रॅफिक पार्क नूतनीकरण आणि त्याचे लोकार्पण या कार्यक्रमात डॉ. तेली बोलत होते. बेशिस्त वाहतूकीसह बेदरकार वाहनचालकांवर चाप लावण्यासाठी पोलिस दलाकडून कारवाई केली जाते. मात्र वाहतूकीचे नियम आणि त्यांची माहिती विद्यार्थीदशेत व्हावी, या हेतून अनोखा कार्याक्रम मुख्यालयात राबवण्यात आला. तीन शाळातील तीनशे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस दलातील श्वान पथक आणि शस्त्रांची ही माहिती देण्यात आली.
पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून आज या पार्कचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमांत शहरातील महात्मा गांधी विद्यालय, वारणाली विद्यालय, नव महाराष्ट्र शाळेतील तीनशे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.
पोलिस मुख्यालयाच्या मैदनावर शस्त्र आणि श्वान पथकाची माहितीही देण्यात आली. अगदी कुतहलाने विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. तसेच यावेळी पोलिस वेशातील सेल्फी पॉईंटचा विद्यार्थ्यांना लाभ घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.