आयकर विभागाच्या कनिष्ठ सहायकाचा विभागाला 263 कोटींचा चुना
मुंबई : खरा पंचनामा
आयकर विभागाच्याच एका कर्मचाऱ्याने सरकारला थोडाथोडका नव्हे २६३ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. तानाजी मंडल अधिकारी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तानाजी अधिकारी हे आयकर खात्यात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉग इन वापरुन टॅक्स रिफंडच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ईडीने छापे टाकून त्यांची सुमारे 166 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
आयकर विभागाच्या या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांशी गोड आयकर विभागाच्या या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांशी गोड बोलून त्यांचा विश्वास जिंकला. अगदी आयकर खात्यातील आयुक्त स्तरावरील अधिकारीही तानाजी अधिकारी यांच्याशी गोडीगुलाबीने वागत. याच विश्वासाचा गैरफायदा घेत तानाजी अधिकारी यांनी आयकर खात्यातील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालयातील लॉग इन्स आणि पासवर्ड मिळवले. याच लॉग इनचा वापर करुन तानाजी अधिकारी खोटे कर परतावे अर्थात टॅक्स रिफंड करत असे. तानाजी अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना खोटे टॅक्स रिफंड क्लेम दाखल करायला सांगत असे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लॉग इनवरुन ते मंजूर करुन टाकत असे. या माध्यमातून तानाजी अधिकारी यांनी तब्बल २६३ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला.
याप्रकरणी ईडीने शनिवारी मुंबई आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी छापेमारी केली. ईडीने जवळपास ३० मालमत्तांवर छापे टाकले. याशिवाय, ईडीकडून तानाजी अधिकारी यांनी खोट्या कर परताव्याच्या माध्यमातून जमवलेल्या पैशातून खरेदी केलेले ३२ प्लॉटस जप्त केले आहेत. तानाजी अधिकारी यांनी या पैशातून लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे, उडपी याठिकाणी अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. याशिवाय, मुंबई आणि पनवेलमध्ये त्याच्या मालकीचे काही फ्लॅटस होते. तसेच तानाजी अधिकारी यांच्याकडे बीएमडब्ल्यू X7, मर्सिडीज GLS400d, ऑडी Q7 या अलिशान गाड्या होत्या. तानाजी अधिकारी यांनी या सर्व मालमत्ता त्याचे सहकारी असलेल्या भुषण पाटील, राजेश शेट्टी, सारिका शेट्टी, किर्ती वर्मा आणि अन्य काही लोकांच्या नावाने विकत घेतल्या होत्या. ईडीने याप्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईत एकूण १६६ कोटींची मालमत्ता गोठवली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.