Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारेचे स्वयंपाकघर सील

पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारेचे स्वयंपाकघर सील



सांगली : खरा पंचनामा 

शहरातील वानलेसवाडी हायस्कूल येथे शालेय पोषण आहारातून ३५ विद्यार्थ्यांना शुक्रवारी विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. संबंधित शाळेत पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदाराचे स्वयंपाक घर सील करण्यात आले आहे. तसेच त्या शाळेसह अन्य शाळेत पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.

वानलेसाडी शाळेत विद्यार्थ्यांना बचतगटाच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. काल शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेत डाळ आणि भात हा पोषण आहार दिला गेला. तो खाल्ल्यानंतर काही वेळाने पाचवी ते सहावीतील सुमारे ३६ विद्यार्थ्यांना मळमळणे, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी बचत गटाच्या संस्थेला माहिती दिली. 

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही शाळेत धाव घेतली. त्रास होऊ लागलेल्या विद्यार्थ्यांना बसमधून वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तपासणी करून २३ विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्यात आले. १२ जणांना घरी सोडले. सायंकाळी आणखी २२ मुलांना सोडले.

दरम्यान, नगरसेवक, सामाजिक कारकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. संबंधित अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवून दोषींवर कारवाईसाठी आग्रही भूमिका घेतली. रात्री उशीरा आहाराचे नमुने तपासणीसाठी घेतले. ते सांगलीतील खासगी आणि पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित ठेकेदारेच स्वयंपाक घर सद्यस्थितीत सील करण्यात आली. अन्य शाळेतील कामही थांबवण्यात आले आहे. शाळेतील पोषण आहाराची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयोग शाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे श्री. गायकवाड यांना सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.