Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा



औरंगाबाद : खरा पंचनामा

औरंगाबादमधून एक धक्कादायक माहिती समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं अंदाजे 700 जणांची प्रकृती बिघडली. 

या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाहसोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र याचवेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली. 

पाहता- पाहता अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 700 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.