Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सायरस मिस्त्री अपघातप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल

सायरस मिस्त्री अपघातप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल पालघर : खरा पंचनामा 

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सुमारे चार महिन्यांनी आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. पालघर पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केलं आहे. कार अपघातात सायरस मिस्त्री आणि त्यांच्यासोबत आणखी एकाचा मृत्यू झाला होता. अनेक प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानंतर पोलिसांनी पालघर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. 

महिला कार चालक अनहीता पंडोल यांनी निष्काळजीपणानं आणि अति वेगानं कार चालवण्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. 4 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलाला धडकून कारचा भीषण अपघात झाला होता. 

या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर महिला कारचालक अनहीता पंडोल आणि एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर अतिवेगानं आणि निष्काळजीपणानं कार चालवण्याचा ठपका ठेवत, कासा पोलिसांनी महिला कार चालकावर गुन्हा दाखल केला होता. आता याच प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. 

4 सप्टेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकाला धडकून उद्योजक सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल (54) यांचा मृत्यू झाला होता. वाहन चालवत असलेल्या अनाहिता पंडोल (55 वर्ष) आणि दारियस पंडोल हे दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले होते. पालघर ग्रामीण पोलिसांनी 5 नोव्हेंबर रोजी भारतीय दंड संहिता कलम 304-अ, 279, 337 आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी साक्षीदार तपासलं आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि मर्सिडीज बेंझ इंडिया, पुणे यांच्याकडून अहवाल प्राप्त केला. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांनी सीट बेल्ट घातला नसल्याचं पोलिसांनी यापूर्वीही सांगितलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.