Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

करणीच्या संशयावरून त्या 7 जणांचा केला नातेवाईकांनीच केला खून!

करणीच्या संशयावरून त्या 7 जणांचा केला नातेवाईकांनीच केला खून! 



दौड : खरा पंचनामा 

दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय होता. मात्र करणीच्या संशयावरून नातेवाईकांनीच त्यांचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. यात आणखी काही जणांनाचाही समावेश असून पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. 

मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), श्याम पंडीत फुलवरे (वय २८, जावई), राणी श्याम फुलवरे (वय २४ मुलगी), रितेश ऊर्फ भैया श्याम फुलवरे (वय ०७), छोटू श्याम फुलवरे (वय ०५), कृष्णा श्याम फुलवरे (वय ०३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) या सात जणांचे भीमा नदीपात्रात मृतदेह सापडले होते. सुरुवातीला हे आत्महत्या असल्याचे उघड झाले. पण पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक म्हणजे करणी केल्याच्या संशयावरुन नातेवाईकांनीच या सात जणांची हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. 

मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार त्यांच्याच चुलत भाऊ असलेल्या धनंजय पवार यांच्यासोबत तीन महिन्यांसाठी त्याच्या सासुरवाडीला गेला होता. पण परताना त्यांच्या अपघात झाला. या अपघातात धनंजय पवार यांच्या मृत्यू झाला. पण अमोल पवार यांच्या कुटुबियांनी धनंजय पवार यांच्यावर करणी केली, म्हणून धनंजय यांचा मृत्यू झाला, असा संशय धनंजय यांच्या कुटुंबियांना होता. या रागातून धनंजय यांच्या कुटुंबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांची हत्या करण्याचा प्लॅन केला. 

धनंजय यांच्या कुटुंबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांना यवत पर्यंत आणलं. रात्रीच्या सुमारास त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकण्यात आले. तर तीन लहान मुले झोपेत असतानाच त्यांनाही भीमा नदीत फेकण्यात आले. करणी केल्याच्या संशयावरुनच धनंजय पवार यांच्या कुटुबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांची कट रचून हत्या केली. हे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. यात आणखी पाच- सहा जणांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.