Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नर्सेस पगारदार पतसंस्था निवडणूक : प्रतिभा हेटकाळे यांना वाढता पाठींबा

नर्सेस पगारदार पतसंस्था निवडणूक : प्रतिभा हेटकाळे यांना वाढता पाठींबा 



सांगली : खरा पंचनामा 

येथील नर्सेस पगारदार पुरुष व महिलांची सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडीसाठी रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत दोन पॅनेल उतरले आहेत. तर सर्वसाधारण गटातून नर्सिंग संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा हेटकाळे निवडणूक लढवत आहेत. सध्या तरी त्यांना सभासदांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. 

जिल्ह्यातील नर्सेस, पुरुष परिचारक यांची ही पतसंस्था आहे. या संस्थेत जिल्ह्यातील बहुतांशी नर्सेस, परिचारक सभासद आहेत. या पटसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यासाठी रविवारी सांगलीतील केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी संचालकांचे जय सहकार विकास पॅनेल तर विरोधकांचे परिचर्या विकास पॅनेल यांच्यात सरळ लढत होत आहे. 

या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून नर्सिंग संघटनेच्या अध्यक्ष प्रतिभा हेटकाळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्या सध्या मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे अधीपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्या 2005 पासून हॉस्पिटलमध्ये सेवेत आहेत. सुरुवातीला त्यांनी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाच वर्षे सेवा बजावली. हेटकाळे या 2010 पासून मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा बजावत आहेत. 

गेली तीन वर्षे त्या नर्सिंग संघटनेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नर्सेस आणि ब्रदर यांच्या विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळेच या निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून लढत असतानाही त्यांना सभासदांचा पाठींबा वाढत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.