मुंबई-गोवा रस्त्यावर ट्रक-कार अपघातात 9 ठार
रायगड : खरा पंचनामा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. इको कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली आहे.
ही धडक एवढी जोरदार होती की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येऊन इको कार वर धडकल्याने हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांसह बचावकार्य सुरु केलं.
इको कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाल्याने बचावकार्यातही अडचण येत होती. अखेर ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या तत्परतेमुळे मुलाचे प्राण वाचले. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरूषांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.