पदवीधर निवडणुकीबाबत मविआचा आज निर्णय!
मुंबई : खरा पंचनामा
सध्या पदवीधर निवडणुक निमित्ताने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय? हे आज स्पष्ट होणार आहे. आज दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याची घोषणा करण्यात येणार आहे.
नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीत अद्याप महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केली नव्हती. या दोन्ही ठिकाणी कोणाला पाठिंबा द्यायचा याची आज घोषणा केली जाणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर होताच नाशिक मतदारसंघातील काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांच्यामुळे जोरदार चर्चा झाली. काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपकडून पाठिंब्याची चर्चा सुरु झाल्यानंतर काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही आश्चर्य व्यक्त केले.
नाशिकमध्ये ज्या पद्धतीने तांबे यांच्याबाबतीत जे घडले आहे ते काँग्रेससाठी गंभीर आहे. त्यामुळे आता पदवीधरबाबत विचार करताना महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते.
नाशिक पदवीधर निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. यात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होईल. सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात काटा लढत होणार आहे. यातील शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तर सत्यजीत तांबे यांना भाजपाचा पाठिंबा जाहीर होऊ शकतो.
महाविकास आघाडीचे जिल्ह्यात म्हणजेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्राबल्य आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.