Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात



बीड : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला बीड जिल्ह्यातील परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही मिळाली आहे. 

यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
"मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना, रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये," असं धनजंय मुंडे म्हणाले. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.