Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुख्यात गुन्हेगाराच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

कुख्यात गुन्हेगाराच्या खुनप्रकरणी दोघांना अटक नवी मुंबई : खरा पंचनामा 

पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील कुख्यात गुन्हेगार संजय कारले याच्या खुनाचे गुढ उकललं आहे. सुमारे ४५ दिवसांनंतर या गुन्ह्यातील दोन संशयितांना अटक पोलिसांना यश आलं आहे. मोहसीन मुलाणी आणि अंकित कांबळे अशी त्या संशयितांची नावे आहेत. 

पैशांच्या देवाण-घेवाण आणि सोन्याच्या व्यवहारांतून हा खून झाल्याचं नवी मुंबईचे गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई-गोवा हायवेवर कर्नाळा अभयारण्याजवळ पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कारमध्ये मावळमधील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी संजय मारुती कारले ( रा. अनिकेत अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याचा मृतदेह आढळून आला होता. 

याबाबत तपास सुरु केल्यानंतर ही गाडी पुण्यावरुन आल्याचं स्पष्ट झालं. मयत आणि संशयित यांच्यात पैशांवरुन वाद झाले होते. कमी किमतीमध्ये जास्त सोनं देतो असं सांगून साडे पाच लाख रुपये त्यांच्याकडून कारले याने घेतले होते. त्यानंतर भेटायला आल्यावर आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. पण कोणतही सोनं न दाखवता आणखी कसले पैसे मागतोस, यावरुन यांच्यामध्ये वाद झाला. 

संजय कारलेचा फसवणूक करण्याचा उद्देश लक्षात येताच संशयितांनी स्वतःजवळील पिस्तुलमधून पाच गोळ्या झाडून ही हत्या केल्याचं उघड झालं होतं. संशयित सराईत गुन्हेगार असल्याचं यावेळी काळे यांनी सांगितलं. दरम्यान, खून करुन दोन्हीही संशयित आरोपी पनवेलवरुन सातारा, तिथून बंगळुरु, जोधपूर, कोलकता आणि तिकडून नेपाळला पळून गेले होते. मात्र संशयित मोहसीन मुलाणी आणि अंकित कांबळे पुण्यात येताच पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.