Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गातून सांगलीला वगळले!

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गातून सांगलीला वगळले!



सांगली : खरा पंचनामा

महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारण्यासाठी शिंदे-फडवणीस सरकारने नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 760 किमी लांबीचा हा एक्स्प्रेस वे बांधला जाणार आहे, जो महाराष्ट्रातील तब्बल 11 जिल्ह्यांना जोडणार आहे. या मार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात येणार आहे. मात्र या महामार्गावर असलेल्या सांगली जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सांगली जिल्ह्याला यातून वगळून हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यात कसा नेणार? सोलापूर जिल्ह्यातून हवाई मार्गे हा रस्ता कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहे का? असा प्रश्न सर्वपक्षीय कृती समितीचे नेते सतीश साखळकर यांनी उपस्थित केला आहे.

गोवा-नागपूर द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ 21 तासांवरून 8 तासांवर येणार असल्याचे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या एक्स्प्रेस वेला शक्तीपीठ एक्सप्रेस वे असे नाव देण्यात आले आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामध्ये समाविष्ट नसलेले विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या एक्स्प्रेसवेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या तीन शक्तीपीठांना जोडल्यामुळे नागपूर ते गोवा द्रुतगती मार्गाला शक्तीपीठ (शक्तीचे आसन) असे नाव देण्यात आले आहे.

गोवा नागपूर द्रुतगती मार्ग नागपूर व गोवा यांना जोडणार आहे, यामुळे शहरांमधील व्यापार वाढण्यास मदत होईल. शक्तीपीठ द्रुतगती मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या तिर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना मिळेल. नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवास वेळ 8 तासांपर्यंत कमी होणार आहे. सध्या नागपूर ते गोवा जाण्यास 21 तास लागतात.

760 किमी लांबीचा, गोवा-नागपूर द्रुतगती मार्ग 11 जिल्ह्यांमधून जाणार आहे. ते जिल्हे असे, यवतमाळ, हिंगोली, नांदेड़, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापुर,  कोल्हापुर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे.

या वर्षांत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. कारण समृद्धी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होताच शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प या नावाने आणखी एक मोठा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमएसआरडीसीने आता प्रकल्पाची कामे आखणी जोरात करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सल्लागार नेमण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सल्लागाराची निवड केली जाईल. त्यानंतर सल्लागाराकडून आराखडा तयार करून मंजूर केला जाईल. त्यानंतर बांधकामाची निविदा निघेल आणि त्यानंतर बांधकाम सुरू होईल.

काम सुरू झाल्यापासून ते काम पूर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपुरातून गोव्याला जाण्यासाठी नागरिकांना 2028-29 पर्यंत किमान प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.