Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता फक्त बार, लॉजचाच आधार!

आता फक्त बार, लॉजचाच आधार!



सांगली : खरा पंचनामा

सांगलीत नवे साहेब येण्याआधी जुन्या साहेबांनी सगळे धंदे बंद केले होते. नवीन साहेबांनी तर ते बंद ठेवलेच शिवाय फुटकळ कारवायाही बंद करायला लावल्या. त्यामुळे जिल्ह्यातील प्रभारीना फक्त बार आणि लॉजचाच आधार राहिला आहे. तोंडी लावायला व्हिडिओ गेम आणि क्लब आहेतच. त्यामुळे सध्या प्रभारीना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे.

जिल्ह्याच्या पालकांनीच धंद्यांबाबत गँभीर आरोप केल्यानंतर सर्व धंदे बंद करण्यात आले. मात्र काहींनी शक्कल लढवून व्हिडिओ गेम शासकीय मान्यताप्राप्त असल्याचे सांगत ते सुरू ठेवले. त्यानंतर क्रीडा मंडळाच्या नावाखाली क्लबही सुरू झाले. हे क्लबही म्हणे मनोरंजन विभागात येतात अशी पळवाट काढण्यात आली. पण प्रमुख धंदे बंद झाल्याने उपवास घडणाऱ्या प्रभारीनी गेम, क्लब तोंडी लावायला ठेवले.

प्रमुख धंदे बंद झाल्यानंतर आता सर्वांचीच भिस्त बार आणि लॉजवर आहे. म्हणूनच जिल्ह्यातील अनेक बार दाखवण्यासाठी रात्री 11 वाजता बंद केले जात आहेत. पण ठराविक बार मागच्या दाराने मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात.

रात्रीची इशारा देणारी गाडी गेल्यानंतर ठराविक बार, हॉटेलच्या दर्शनी भागातील लाईट बंद केल्या जातात. मात्र मागच्या दाराने ग्राहक आत जाताना दिसून येतात. इशारा देणाऱ्या गाडीतील लोकांना कोल्ड्रिंक्स, रात्री उशीराच जेवण ट्रीट म्हणून दिले जाते.  ठराविक बार, हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास मूक संमती कोणाची आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या हॉटेल, बार सोबतच लॉज हे एक चांगले साधन आहे. यातून चालकासह अन्य लोकांनाही मलिदा मिळतो. त्यामुळे अनेक लॉजवर सुरू असलेल्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नवीन साहेबांनी याकडेही लक्ष देऊन दुधाची तहान ताकावर भागवनाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हॉटेल, बार, लॉजला अभय देणारे शोधून काढण्याचे आव्हान नवीन साहेबांसमोर आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.