Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादांबाबत राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांचे मौन?

अजितदादांबाबत राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांचे मौन? मुंबई : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या दाव्याने चांगलेच तापलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अजित पवार यांचे विधानाशी सहमत आहे की नाही याबाबतचा सुद्धा खुलासा केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी याबाबत मौन का बाळगले आहे असा प्रश्न अजितदादा यांचे समर्थक विचारत आहेत.

अजित पवार यांनी नागपुरच्या अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर कधीच नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असा दावा केला होता. हिवाळी अधिवेशन सुरू असतांना शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी आपल्या भाषणात हे विधान केले होते. त्यानंतर ठिकठिकाणी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी आंदोलन करत अजित पवार यांचा निषेध नोंदविला आहे. 

मात्र, पवार यांनी केलेल्या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी केलेले विधान वगळता याबाबत कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे पहिल्या फळीतील कोणत्याही नेत्याने याबाबत विधान न केल्याने किंवा प्रतिक्रिया न दिल्याने अजित पवार यांच्या विधानाशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच सहमत नसल्याची चर्चा सुरू आहे.

जितेंद्र आव्हाड यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक होते यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असतांना राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते गप्प असल्याचे चित्र असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांनीही यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.