Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तस्करांच्या दबावामुळे कोल्हापूरची ती जागा 'त्या' अधिकाऱ्याने ठेवली रिक्त!

तस्करांच्या दबावामुळे कोल्हापूरची ती जागा 'त्या' अधिकाऱ्याने ठेवली रिक्त!



सांगली : खरा पंचनामा

गोव्यातून दारू तस्करी करणाऱ्यांचे फार मोठे रॅकेट कार्यरत आहे. या दारू तस्करांचे महाराष्ट्रातील बड्या अधिकाऱ्यांशी साटलोट आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागीय उपायुक्त पद त्या अधिकाऱ्याच्या सांगण्याने रिक्त ठेवण्यात आले आहे. त्या पदासाठी उपयुक्त असलेल्या अधिकाऱ्याकडे फक्त तात्पुरता कार्यभार दिला आहे. दारू तस्करी करणाऱ्या माफियांना खुली सूट देण्यासाठी आणि त्यांनी टाकलेल्या 'अर्थ'पूर्ण दबावामुळे ही जागा लायक अधिकाऱ्याला दिली जात नसल्याची चर्चा आहे.

राज्याचं सगळं संचलन करणारा अधिकारी स्वतःला खात्याचा सर्वेसर्वा समजतो. एका वजनदार राजकीय नेत्याचा (सध्याच्या विरोधी पक्षातील) नातेवाईक असल्याचे सांगत हा अधिकारी मनमानी कारभार करत आहे. गोव्यातून तेथील दारूची महाराष्ट्रात तस्करी केली जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांनी गोवा बनावटीची दारू पकडल्याच्या प्रेस नोट दिल्या आहेत.

राज्याचे भरारी पथक ज्याच्या अधिपत्याखाली काम करते असा हा राज्याचे संचलन करणारा अधिकारी या कारवाईचे कौतुक करतो. मात्र ज्या जिल्ह्यातील विभागीय उपायुक्त अशी तस्करी थांबवण्याचे काम करू शकतात त्यांच्या नियुक्तीलाच विरोध करतो अशी चर्चा आहे.

गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणण्यासाठी एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटचे माफिया महाराष्ट्राचे संचलन करणाऱ्या अधिकाऱ्याशी संगनमत करून आहेत असे बोलले जाते. त्यामुळे या माफियांना अभय देण्यासाठी तो राज्याचे संचलन करणारा अधिकारी कोल्हापुरात सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून देत नाही असे त्याच्याच खात्यातील अधिकारी, कर्मचारी बोलत आहेत.

या पदासाठी सक्षम असलेला आणि सध्या दोन दोन पदभार सांभाळणारा अधिकारी या पदासाठी योग्य आहे असे बोलले जाते. पण सध्या तात्पुरता कार्यभार असलेल्या या अधिकाऱ्याला त्या पदावर नियुक्त केल्यास आपण अडचणीत येऊ अशी भीती राज्याचे संचलन करणाऱ्या अधिकाऱ्यास आहे. त्यामुळे गोवा दारूची तस्करी रोखायची असेल तर कोल्हापुरात त्याच सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.