पोलिस उपअधीक्षकाच्या नावाने शिपायाने परस्पर मागितले फुटेज!
पुणे : खरा पंचनामा
लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या करुन त्यांच्या शिक्क्यांचा वापर करुन कार्यालयातील शिपायाने बनावट पत्र तयार करून सीसीटीव्ही फुटेज मगितल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी लोहमार्ग उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लोहमार्ग मुख्यालयातील कार्यालयीन कर्मचारी एस. सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ नोव्हेबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता.
खडकी येथे लोहमार्ग पोलीस मुख्यालय आहे. पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या कार्यालयात सोनवणे हा शिपाई आहे. त्याने फिर्यादी यांची परवानगीशिवाय कार्यालयात प्रवेश करुन कुलूप उघडले. चंद्रकांत भोसले व पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या नावाचा गोल शिक्का तसेच फिर्यादी यांच्या खोट्या सहीचा वापर करुन स्वत:च्या फायद्यासाठी बनावट पत्र तयार केले.
ते खरे असल्याचे भासवून त्याने ते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना पाठविले.
त्यात त्यांनी हॉस्पिटलकडील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. हा प्रकार आता लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे यांच्याकडे चौकशी केल्यानंतरच त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज का मागितले, हे समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.