Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूरच्या वकील महिलेला लुटल्याप्रकरणी एकाला अटक

कोल्हापूरच्या वकील महिलेला लुटल्याप्रकरणी एकाला अटकसांगली : खरा पंचनामा

कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज-पंढरपुर रस्त्यावरील कुचीजवळ कोल्हापूरच्या एका वकील महिलेसह अन्य लोकांना लुटल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जलवा उर्प त्रिदेव सिसफुल भोसले (वय ४२, रा. लिंगनूर, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे चार साथीदार पसार झाले असू त्यांचा शोध सुरू असल्याचे डॉ. तेली यांनी सांगितले.

कोल्हापूर येथील माधवी जनार्दन जानकर, विकास परशुराम हेगडे व  ऍड. भाग्यश्री विलास पाटील हे दि. ३० डिसेंबर रोजी पहाटे कोल्हापूरहून पंढरपूरकडे चारचाकीतून निघाले होते. भाग्यश्री पाटील या मोटार चालवत होत्या. कुची गावच्या हद्दीत रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एका धाब्यानजीक त्यांच्या मोटारीवर दगड मारला. यामुळे भाग्यश्री पाटील यांनी मोटार रस्त्याकडेला उभा केली. काही कळण्याच्या आतच पाचजण तेथे आले. यातील दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळ असलेले सोन्या-चांदिचे दागिने व रोख रकमेसह मोबाईल असा एक लाख ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. 

यावेळी संशयितांसोबत झटापटही झाली. यात ते दोघे जखमी झाले.
या दरोड्याचा तपास एलसीबीकडे होता. एलसीबीच्या पथकाला जलवा भोसले व त्याच्या साथीदारांनी दरोडा टाकल्याची माहिती मिळाली. पथकाने लिंगनूर येथे छापा टाकून जलवा याला ताब्यात घेतले.  जलवाकडून पोलिसांनी चोरीतील मोबाईल हस्तगत केला आहे.

दरम्यान, दरोड्यातील पाचही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. जलवा याच्याविरूद्ध तासगाव (जि. सांगली), रांजणगाव (जि. पुणे) पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्या साथीदावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

या कारवाईत पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जितेंद्र शहाणे, जितेंद्र जाधव, मेघराज रूपनर, दीपक गायकवाड, चेतन महाजन, प्रशांत माळी, सुहेल कार्तियानी यांनी सहभाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.