मांजामुळे दोन पोलीस गंभीर जखमी
पुणे : खरा पंचनामा
नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होतातच शिवाय रस्त्याने जाणारे नागरिक देखील जखमी होत आहेत. संक्रांतीला पतंगबाजी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नायलॉन मांजामुळे दुचाकीवरुन जाणारे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-सातारा रोडवरील शंकर महाराज उड्डाणपुलावर झाला.
महेश पवार आणि सुनील गवळी अशी गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर मुख्यालयात नियुक्तीस असून रविवारी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मांजा मानेला अडकल्याने महेश पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली. तर त्यांच्यासोबत असलेले सुनील गवळी यांच्या हाताला मांजा गुंडाळला गेल्यामुळे हात कापला.
पक्षीमित्र बाळासाहेब ढमाले हे शंकर महाराज उड्डाणपुलावरुन दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.