Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माती करायची का सोनं त्यांच्या हातात!

माती करायची का सोनं त्यांच्या हातात!



पुणे : खरा पंचनामा

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक वादावर अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. 
"हे महिला महिलांचं चाललं आहे. आम्ही महिलांना संधी देतो. त्याची माती करायची का सोन हे त्यांच्या हातात आहे, " असे अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यात वेगळा वाद रंगलाय. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन आक्षेप घेत चित्रा वाघ कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत.

उर्फीविरोधात चित्रा वाघ यांनी थेट मुंबई पोलीस आणि राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. चित्रा वाघ यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

यासोबत राज्य महिला आयोगावरही चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं, असं प्रत्युत्तर दिलं.

दुसरीकडे उर्फीनंतर चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातच वाद पेटला आहे. उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी करत चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याच्यावर टीका केली होती. महिला आयोग उर्फी जावेदचे समर्थन करतंय का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

"प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातूनही कुणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला, तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांनाही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही," असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.