Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रागाच्या भरात 14 वार करून मित्राचा खून

रागाच्या भरात 14 वार करून मित्राचा खून



मुंबई : खरा पंचनामा

रागाच्या भरात मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना मुंबईतील मानखुर्दमध्ये घडली. शाब्दिक बाचाबाचीतून हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले अन् कोयता आणि तलवारीचे तब्बल १४ वार करत मित्राचा खून करण्यात आला. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

बिस्मिलाह मेहबुब शेख यांच्या तक्रारीवरून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तय्यब अझहर खान असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात, मानेवर आणि हातावर १४ वार करण्यात आले. खानची आई दुबई येथे घरकाम करण्याची नोकरी करते. वडील त्यांच्यापासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे तो आजीकडे राहण्यास होता. तय्यब आणि आरोपींना नशेचे व्यसन होते.

मानखुर्द लल्लुभाई कंपाऊंड येथील एका कॉन्व्हेन्ट शाळेच्या शेजारी असलेल्या पडक्या शौचालयात ते नशा करण्यासाठी बसले होते.
दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते दि. ५ जानेवारी दुपारी २ च्या दरम्यान ही घटना घडली. तय्यब हा नेहमीप्रमाणे नशा करण्यासाठी बसला होता.

यादरम्यान आधीच्या भांडणातून किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली. याच रागात चौघांनी त्याच्यावर नशेत कोयता, तलवारीने वार केले. गुरुवारी त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. तय्यबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला. खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत वरील घटनाक्रम उघडकीस आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.