Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुणीही कितीही मोठ्या बापाचा असेना...

कुणीही कितीही मोठ्या बापाचा असेना... पुणे : खरा पंचनामा 

महाराष्ट्र राज्यात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अगदी अजित पवारानेही तसा प्रयत्न करू नये, तसाच तो शेवटच्या माणसानेही करू नये. कायदा बिघडवण्याचा कुणी प्रयत्न कुणी केला तर कुणीही किती मोठ्या बापाचा असेल, विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षातील असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे मत अजित पवार यांनी मांडले. 

पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मध्यंतरी कोयता गँग कोयता गँग म्हणत होते. त्यावरून सभागृहात असं सटकवलं मी, सरकारला म्हटलं हे काय चाललं आहे काही धाक आहे की नाही? असं म्हणत अजित पवार यांनी सरकारला जाब विचारला आहे. एवढंच नाही तर त्यांनी कायदा-सुव्यस्थेचा चांगलाच समाचार घेतला. 

पवार म्हणाले, पोलिसांचं काम नाही का कायदा आणि सुव्यवस्था राखणं? जे काही व्हायचं असेल ते कायद्याच्या कक्षेतच झालं पाहिजे. राज्यात सगळ्यांना समान अधिकार आहेत. मलाही तोच नियम लागू आहे जो सामान्य माणसाला लागू आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. याविषयी अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पोलिसांचा काही धाक आहे की नाही? असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. 

पुण्यातल्या सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या भागात कोयता गँगने दहशत माजवली होती. त्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने योग्य ते निर्देश दिले पाहिजेत असंही अजित पवार यांनी सांगितलं होतं. कोयता गँगचं वाढतं लोण थांबवण्यासाठी आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई केली जावी अशीही मागणी अजित पवार यांनी केली होती. या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा त्यांची दहशत मोडून काढा, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.