Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य राखीव पोलिस दल सर्वसाधारण विजेते

राज्य राखीव पोलिस दल सर्वसाधारण विजेतेपुणे : खरा पंचनामा

वानवडी येथे आयोजित ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 

वानवडी येथे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप आज झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासह लोकशाहीची मुल्ये जपण्याकरिता पोलीस दल कार्यरत आहे. विपरीत परिस्थितीत पोलीस कर्मचारी काम करतात. पोलिसांनी कोरोना काळात जीवनाची जोखीम पत्करून प्रचंड काम केले. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशाही परिस्थितीत सामान्य माणसाचे जीवन सुकर व्हावे यासाठी पोलीस दलाने काम केले, असेही फडणवीस म्हणाले.

पोलीस दलातील खेळाडू देशाचे नाव मोठे करतात उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलीस दलातील क्रीडापटूंसाठी या स्पर्धा महत्वाच्या असून त्यातून क्रीडा गुणांना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी पदके मिळवतात, देशाचे नाव मोठे करण्याचे काम करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी या स्पर्धांना महत्व आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले, या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या उत्साहात पार पडल्या. पोलीस खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, संघभावना वाढावी, आरोग्य राहावे मनोबल वाढावे यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत. या स्पर्धेत ६ नवीन विक्रम नोंदले गेले. पुणे येथे २८ एकर जागेत पोलीस क्रीडा संकुल आणि होस्टेल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे, असेही ते म्हणाले.

महिला गटात मंजिरी रेवाळे यांनी सुवर्णपदक, प्रियंका फाळके रौप्यपदक आणि नाजुका भोर यांनी कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात पप्पू तोडकर यांनी सुवर्णपदक, बाबासाहेब मंडलिक रौप्यपदक आणि मल्लिकार्जुन बिराजदार यांनी कांस्यपदक पटकावले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस महासंचालक तथा गृह रक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अनुप कुमार सिंग यांनी केले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आभार मानले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.