Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गस्तीवरील पोलिसावर चाकूने वार!

गस्तीवरील पोलिसावर चाकूने वार!



पुणे : खरा पंचनामा

रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून एकाने गस्तीवरील बीट मार्शलवर चाकूने वार केले. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले (वय 24 रा. नळदुर्ग) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास लोहगाव येथील धानोरी जकात नाका येथे घडली. 

पोलीस नाईक सचिन जगदाळे हे लोहगाव बीट मार्शलवर पेट्रोलींग करत होते. त्यावेळी त्यांना प्राप्त झालेल्या कॉलनुसार ते समायरा चायनीज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित त्याठिकाणी जेवण करण्यासाठी आला होता. त्याला जेवण मिळाले नसल्याच्या रागातून त्याने चायनिज सेंटर मधील चाकूने जगदाळे यांच्या डाव्या गालावर वार केला. यामध्ये बताले याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सचिन जगदाळे यांना तातडीने खासगी दावाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.