Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

क्रिप्टोत गुंतवणुकीच्या आमिषाने तिघांना 56 लाखांचा गंडा

क्रिप्टोत गुंतवणुकीच्या आमिषाने तिघांना 56 लाखांचा गंडासांगली : खरा पंचनामा

शहरातील विश्रामबाग येथील प्रुवी असोसिएटस् या कंपनीत क्रिप्टो करन्सीच्या योजनेत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील तिघांना ५६ लाख १९ हजार ९०० रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

दीपक चव्हाण (वय ३८), कविता चव्हाण (वय ३३ रा. दोघेही मिरज ) आणि अर्जून जाधव (रा. समडोळी ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक साळुंखे (रा. कवठेपिरान) विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

विश्रामबाग येथील नेमिनाथनगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये प्रुवी असोसिएटस् ऑनलाईन क्रीप्टो ट्रेड आणि ऑफलाईन सर्व्हिस या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीत कार्यरत असणाऱ्या संशयीत तिघांनी जादा परतावा देण्याच्या आमिष दाखवल्याने अशोक साळुंखे यांनी या कंपनीमध्ये ३२ लाख ३५ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. साळुंखे यांना दरमहा सुमारे दहा टक्के पर्यत परतावा मिळेल, असे संशयीतांनी सांगितले होते. 

कमी कालावधीत अधिक परतावा मिळत असल्यामुळे साळुंखे यांनी कंपनीमध्ये फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत रोख तसेच बँकेच्या माध्यमातून पैसे गुंतवले. संशयीतांनी साळुंखे यांना मार्च २०२१ ते जानेवारी २०२२ पर्यत गुंतवणूकीचा परतावा म्हणून ९ लाख २० हजार रुपये दिले. तसेच विश्‍वास संपादन करण्यासाठी हमी पत्र तसेच पुढील तारखेचे ठराविक रकमेचे धनादेश दिले. 

परंतु कालांतराने गुंतवलेली रक्कम आणि त्या रकमेवरील परतावा देण्यात संशयीतांनी टाळाटाळ सुरु केली.
वारंवार पैसे मागूनही कंपनीकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने फिर्यादी साळुंखे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यासर्व प्रकारात साळुंखे यांची २३ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली. त्यांच्याप्रमाणेच कंपनीत गुंतवणूक केलेले पांडुरंग गायकवाड (रा. कवठेपिरान ) यांची ८ लाख ६४ हजार ४५० रुपये तसेच सागर यमगर (रा. रांजणी) यांची २४ लाख ४० हजार ४५० रुपयांची फसवणूक सदर संशयीतांकडून करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात फिर्याद दाखल केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.