Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची सोमवारी अधिकृत घोषणा?

शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची सोमवारी अधिकृत घोषणा?मुंबई : खरा पंचनामा

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीची काही दिवसांपूर्वी युतीची घोषणा झाल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर हे करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या युतीबाबत मागील अनेक दिवसांपासून दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. 

मध्यंतरी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची बैठकही झाली. उद्या दादरमध्ये आंबेडकर हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत दोन्ही प्रमुख नेते आपली भूमिका मांडणार असल्याचे कळते. प्रकाश आंबेडकरांनी मैत्रीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिला होता. प्रकाश आंबेडकरांनी दोन ते तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आधीच म्हटलं. त्यामुळे राज्यातील दोन्ही दिग्गज नेते लवकरच एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.