खंडणीसाठी मनसेच्या जिल्हाध्यक्षवर गोळीबार!
पुणे : खरा पंचनामा
पुणे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या घरासमोर हा प्रकार घडला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. खंडणीसाठी त्यांच्यावर गोळीबार झाल्याची चर्चा आहे.
समीर थिगळे राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील घरासमोर असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. मी खेडचा भाई आहे, एकाला घालवलाय, तुलाही माज आला आहे. तुला ही संपवतोच असं म्हणत पिस्तुल रोखून थिगळे यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला.
हल्लेखोरांनी समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडली. मात्र सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करुन थिगळे यांना धमकावून पळून गेले.
हल्लेखोर सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोक्का आणि खुनासारखे
गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. या घटनेनंतर राजगुरुनगर पोलिसांनी मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.