Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंबेडकर यांना आघाडीत घेण्यास विरोध नाही

आंबेडकर यांना आघाडीत घेण्यास विरोध नाही कोल्हापूर : खरा पंचनामा 

शिवसेनेसोबतच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र रिपब्लिकन पक्षातील काही गटांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांचा आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीत येण्यास विरोध नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा महाराष्ट्रापुरता प्रयत्न आहे. काही राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षातील काही गटांचा आघाडीत समावेश करावा, अशी इच्छा आहे. आम्ही चर्चेच्या स्थितीत आहोत. अंतिम निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अनेक प्रश्नावर एकत्रित निर्णय घेतो. उद्याच्या निवडणुकीसाठीही एकत्रित भूमिका घ्यायला काही अडचण येणार नाही, असं शरद पवार म्हणाले. 

राज्यात सुरू असलेल्या वादांवर पडदे पाडण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्यात काही मतभेद असते तर गोष्ट वेगळी आहे. पण भाजप आणि काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेना असे प्रश्न आले तर संघर्ष होणारच. ते काही थांबणार नाही, असं पवार म्हणाले. 

सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विधाने वेगळीच आहेत. काही लोक तुरुगात टाकणार असं म्हणत आहेत. काही लोक जामीन रद्द करू असा इशारा देत आहेत. ही राजकीय नेत्यांची कामे नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे, असा चिमटा पवार यांनी काढला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपण राज्यात नाखूश असल्याचं म्हटलं होतं. 

राज्यपालांच्या या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. नाखूश असेल तर आम्हीही सर्व नाखूश आहोत, असा चिमटा त्यांनी काढला. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. चांगले राज्यपाल आम्ही पाहिले. पीसी अलेक्झांडरपासून अनेक उच्च दर्जाचे राज्यपाल होते, असं ते म्हणाले. कोणत्याही पक्षाचे असो, पण आजवरच्या राज्यपालांनी राज्याच्या हिताचं काम केलं. घटनेचं पालन केलं. हे पहिले राज्यपाल आहेत त्यांच्याबद्दल चर्चा होते. सतत लोक त्यांच्यावर टीका करतात. लोक त्यांच्यावर नापसंती व्यक्त करत आहेत. हे महत्त्वाचं पद आहे. त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. पण ती यांच्याकडून राखली जात नाही, अशी टीका त्यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.