Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोदींशी जवळच्या संबंधाच्या चर्चा निराधार : अदानी

मोदींशी जवळच्या संबंधाच्या चर्चा निराधार : अदानी 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

आपला व्यवसाय मोठा होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याच्या चर्चा निराधार आहेत, कारण आपण विरोधीपक्षांच्या राज्यातही व्यवसाय करत आहोत. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्येही आम्ही गुंतवणूक केली आहे. त्याबद्दल राहुल गांधी यांनी कौतुक केले आहे. राहुल गांधी विकास विरोधी नाहीत असे मत प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. 

ते म्हणाले, प्रत्येक राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचं आमचं ध्येय आहे," आम्ही केरळमध्ये काम करत आहोत, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतही काम करत आहोत, नवीन पटनायक, जगनमोहन रेड्डी, केसीआर. ज्या ठिकाणी स्थानिक पक्षांचं सरकार आहे तिकडेही आम्ही करतोय. आपल्याला यापैकी कोणासोबतही काम करण्यास समस्या आली नसल्याचं अदानी यांनी स्पष्ट केलं. 

तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्याशी धोरणात्मक चर्चा करू शकता. तुम्ही देशहिताच्या चर्चा करू शकता. परंतु जे धोरण तयार होतं ते सर्वांसाठी तयार होतं, ते केवळ अदानी समूहासाठी तयार होत नाही," असं अदानी यांनी स्पष्ट केलं. 'आपल्या समूहाला प्रमोट केलं जातंय हा एक गैरसमज " आहे. यामुळे बँका आणि सामान्यांची बचत धोक्यात येऊ शकते. गेल्या सात आठ वर्षांमध्ये आमच्या कर्जामध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढलं आहे. आज आमची एकूण संपत्ती कर्जाच्या तुलनेत तीन ते चार पट झाली आहे," असं त्यांनी नमूद केलं. 

गुंतवणूक करणं आमचं सामान्य काम आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निमंत्रणावरून मी गुंतवणूकदारांच्या संमेलनातही गेलो. त्यानंतर राहुल गांधींनी आमच्या राजस्थानातील गुंतवणूकीचं कौतुक केलं. राहुल गांधींची धोरणंही विकासविरोधी नाहीत याची आपल्याला कल्पना असल्याचं अदानी यांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.