Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मालपाणी दिल्याशिवाय फाईलच हलत नाही!

मालपाणी दिल्याशिवाय फाईलच हलत नाही! 



मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्रात उद्योग वाढवायचे असतील तर कामात पारदर्शकता हवी. पण आपल्याकडे मालपाणी दिल्याशिवाय फाइलच हलत नाही, असा टोला केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला. विश्व मराठी संमेलनातील गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

गडकरी म्हणाले, ही संत, साहित्यिक, समाजसुधारक, उद्योजक, विचारवंत, संशोधकांची भूमी आहे. तिला निर्माणकर्त्यांची भूमी बनवू या, निर्यातक्षम देश म्हणून भारताची प्रतिमा तयार करू या, असे आवाहन त्यांनी केले. 

संमेलनाच्या सांगतेवेळी ते म्हणाले. मराठीचे मोठेपण महाराष्ट्रात राहून समजत नाही, पण महाराष्ट्राबाहेर गेल्यावर त्याची जाणीव नक्कीच होते. इथले नाटक, साहित्य, काव्य आठवते. आज शहरीकरण वाढले असले तरी ग्रामीण भागात विकासाचा वेग कमी आहे. गायीच्या शेणाचा वापर करून बऱ्याच गोष्टी करता येणार आहेत. त्यामुळे भविष्यात शेणाला ५ रुपये किलो भाव मिळाला तर शेतकरी का आत्महत्या करील? 

कोकणात उद्योग गेले पाहिजेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा, तिथल्या प्रत्येक गावाचा विकास व्हायला हवा. स्मार्ट सिटीसोबत स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे. देशातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करायचे आहे. पुढील इंधन इथेनॉल असेल. यासाठी फ्लेक्स इंधन आणले आहे. हे इंजिन इथेनॉलवर चालले. टोयोटाच्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर येणार आहेत. 

मराठी माणूस नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा बनायला हवा. येणाऱ्या काळात उद्योजकता वाढवण्याची गरज आहे. हे सरकार गुंतवणूकदारस्नेही असल्याने सर्व मराठी उद्योजकांनी खुल्या मनाने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.