Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पानसरे हत्या प्रकरणात कोर्टाचे महत्वाचे निर्देश

पानसरे हत्या प्रकरणात कोर्टाचे महत्वाचे निर्देश



मुंबई : खरा पंचनामा

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ९ जानेवारीपासून या खटल्यामध्ये घडामोडी वाढणार आहे. या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी हायकोर्टाकडे करण्यात आली होती. २०१५ मध्ये पानसरे कुटुंबियांच्या वतीने दाखल करण्यात आलेली ही याचिका प्रलंबित का ठेवावी? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला.

२० फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पानसरे हत्याकांड खटल्याची कोल्हापूर सत्र न्यायालयातील कारवाई सुरूच ठेवा, हायकोर्टाने राज्य सरकारला असे निर्देश दिले आहेत. येत्या 9 जानेवारीपासून खटल्यातील आरोपींविरोधात आरोपनिश्चितीची प्रक्रिया खटल्यातील आरोपींविरोधात आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच पुढील सुनावणीत नव्यानं तपास करणाऱ्या एटीएसला प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

गोविंद पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कन्नड अभ्यासक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात एटीएसनेच धागेदोरे शोधले होते. 

एटीएसने २०२० मध्ये औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात काही जणांना अटक केली होती. त्यातून या चारही हत्यांचे सूत्रधार सारखेच असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच फरारी संशयित सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनीच पानसरे यांच्यावर गोळीबार केल्याचे चौकशीत उघड झाले होते, असे पानसरे कुटुंबीयांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.