Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर 



मुंबई : खरा पंचनामा 

शिवसेना कुणाची? या एका प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणावर आता 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. हिमा कोहली, न्या. एम आर शाह, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचुड, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. पी. एस नरसिंम्हा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तर बाळासाहेबांची ठाकरे पक्षाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. 

सुनावणी दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात संदर्भात आता 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. सात सदस्य घटनापीठाला आमचा विरोध आहे असे स्पष्ट मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वकील निहाल ठाकरे यांनी सांगितलं. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडले. 40 आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भाजपच्या मदतीने सरकार देखील स्थापन केले. मात्र हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते. सत्तासंघर्षप्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती. त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता होती.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.