Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एमसीए'च्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड

'एमसीए'च्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवडपुणे : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडली. यावेळी आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला. किरण सामंत यांची असोशिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

'एमसीए'च्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल एमसीएच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा, तसंच एमसीएचे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं, अशी प्रतिक्रियाही पवार यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.