Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साखळी बॉम्बस्फोटची धमकी देणाऱ्यास अटक

साखळी बॉम्बस्फोटची धमकी देणाऱ्यास अटक मुंबई : खरा पंचनामा  

मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात फोन करुन 1993 प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्याने मुंबईत दोन महिन्यानंतर माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा या ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करत या प्रकरणी एकाला अटक केली आहे.   
फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना सांगितले की, शहरात दंगल घडवण्यासाठी इतर राज्यातून बऱ्याच लोकांना बोलावण्यात आले आहे. हे बॉम्बस्फोट 1993 प्रमाणे मुंबईत होणार असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला होता. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आला होता.   

या फोननंतर मुंबई पोलिसांनी याबाबत एटीएसला माहिती दिल्यानंतर दोन पथके तयार करण्यात आली. त्यानंतर जूहू युनिटच्या पथकाने नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला (वय 55) याला मालाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्या लाला विरुद्ध मुंबईमध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे 12 गुन्हे दाखल असून 2021 मध्ये त्याला मालाड पोलीस ठाणे मार्फत हद्दपार करण्यात आले होते. एटीएसच्या पथकाने आरोपीला आझाद मैदान पोलीस ठाण्याच्याताब्यात दिले आहे. आरोपीने फोनवरुन अशी धमकी का दिली हे अद्याप समजू शकले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.