राज्यात आणखी चार दिवस थंडीचा कडाका
मुंबई : खरा पंचनामा
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यातही जाणवू लागला आहे. गोंदिया आणि नागपुरात कडाक्याची थंडी पडली आहे. शिवाय मुंबई, पुण्याचा पाराही घसरला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. आणखी चार दिवस थंडी कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
गोंदियात पारा 7 अंशावर गेला आहे. यंदाच्या मोसमातलं ते सर्वत कमी तापमान ठरले आहे. राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात वाढ झाली आहे. मात्र पुढील चार दिवसांत तापमानात आणखी घट होणार आहे. मुंबईचा पाराही 15 अंशाच्या खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील आठवड्यात मुंबईचे तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली जाणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून थंडी वाढत आहे. असे असताना मुंबई आणि पुण्याची हवा बिघडल्याचे दिसत आहे. हवेचे प्रदूषण वाढल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे. दिल्ली पेक्षा मुंबईत हवा सर्वाधिक प्रदुषित झाल्याचे दिसून येत आहे. या बदलाचा परिणाम हा तापमान वाढीवर झाला आहे.
तर दुसरीकडे उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घटले आहे. नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव लुटत आहेत. राज्यात 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईचे तापमान काल 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तथापि, पुढील दोन दिवस सरासरी तापमानाचा पारा हा 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उद्या सोमवारी तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचीही शक्यता आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या काही भागांत पश्चिमी चक्रवाताचा परिणाम म्हणून थंडीची तीव्र लाट आली असून, दाट धुक्याची चादर पसरलेली दिसून येत आहे. राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र किमान तापमान ढगाळ स्थितीमुळे सरासरीपुढेच असल्याने थंडी आटोक्यातच आहे. विदर्भातील काही भागांत तापमानात मोठी घट झाली असून, ती आणखी एक-दोन दिवस कायम राहणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.