तर गुन्हा दाखल करा!
मुंबई : खरा पंचनामा
मी माझ्या कामाला आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देतो. आम्ही आगोदरपासूनच पुरोगामी विचार मानणारे असून महापुरुषांच्या विचारांना धक्का न लावता पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून केलेल्या घटना, नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे. त्यासोबत विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तसेच मी जी भूमिका मांडली ती सर्वांना पटली पाहिजे असे नाही. पण मी मांडलेली भूमिका चूकीची आहे हे ठरवणारं कोण? मी असा काय गुन्हा केला? जनतेला जी भूमिका पटेल त्याचे ते स्वागत करतील. मी जर द्रोह केला असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांच्या विधानावरुन भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपण केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाबाबत त्यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणाव हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. तुम्हाला जर हा द्रोह वाटत असेल तर गुन्हा दाखल करा. पण हा गुन्हा नियमांत बसतो का? छत्रपतींच्या विचारांसोबत आम्ही द्रोह करणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाची हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच.
पण ते धर्मवीर नाही, असं म्हणणं एक प्रकारे संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह असून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अन्यायच आहे. संभाजी महाराज यांना कशासाठी एवढा अत्याचार सहन करावा लागला. देव, देश आणि धर्मासाठी संभाजी महाराज लढले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर या महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच, धर्मवीर नाही म्हणणं हा द्रोह असल्याचे म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.