Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रालयासमोर निवृत्त सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर निवृत्त सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न



मुंबई : खरा पंचनामा

राज्यासह देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह एकीकडे सुरू आहे. तर दुसरीकडे, राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयासमोर एका निवृत्त सैनिकांने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रजासत्ताकदिनीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

वेळीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी मंत्रालयासमोर सुरेश मुंडे नावाच्या निवृत्त सैनिकाने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण वेळीच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सुरेश मुंडे या तरुणाला ताब्यात घेतलं.

सुरेश मुंडे हा बीडचा राहणार आहे. बीड पोलीस फसवणूक प्रकरणामध्ये नेत्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही, त्यामुळे या तरुणाने मंत्रालयासमोर आत्महत्याचे प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरेश मुंडे हा पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.