Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस ठाण्याच्या बराकमध्ये कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून आत्महत्या

पोलिस ठाण्याच्या बराकमध्ये कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून आत्महत्यानवी दिल्ली : खरा पंचनामा

आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. मात्र दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. दिल्ली येथील पोलिस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र कुमार यांनी पहाड गंज पोलिस स्टेशनच्या बॅरेक क्रमांक ३ मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. प्रजासत्ताकदिनी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिस शोधत आहेत.

त्यांच्याकडून सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. मात्र त्यातील तपशील मिळू शकला नाही. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीसानी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव देवेंद्र कुमार असे आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.

आज दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबलने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या बॅरेकमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटचा तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.