Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

म्हणून त्याने कुटुंबियांच्या जेवणात कालवले विष!

म्हणून त्याने कुटुंबियांच्या जेवणात कालवले विष!पुणे : खरा पंचनामा

शहरातील केशवनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, याप्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इंजिनीअर तरुणाने आपल्या शिक्षणासोबत शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. सुरुवातीला नफा कमवला. अनेकांना प्रेरित करून त्यांच्यांकडून पैसेही घेतले. मात्र, बाजारात सातत्याने मंदी येत गेल्याने तो निराशेत गेला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. आई-वडील आणि बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष कालवून त्याने आपले संपूर्ण कुटुंबच संपवल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

दीपक थोटे (वय 59), इंदू थोटे (वय 45), ऋषिकेश थोटे (वय 24) आणि समीक्षा थोटे (वय 16 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवाशी दीपक थोटे यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. मुलाने इंजीनिअरची पदवी मिळवली होती. तर सर्वात लहान मुलगी शिक्षण घेत होती. मुलगा ऋषिकेश थोटे हा इंजिनीअर झाल्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. त्यामध्ये त्याला सुरवातीला चांगला नफा मिळत गेला. त्यातून त्याने दर्यापूर येथे नवीन घर बांधले होते. 

ऋषिकेशने दर्यापूर शहरातील अनेकांकडून पैसा घेतला आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. नंतर ऋषिकेश हा आपल्या कुटुंबाला घेऊन एक वर्षापूर्वी पुण्यात राहण्यासाठी गेला. पुण्यात तो एका खासगी कंपनीमध्ये कामही करत होता. 

ऋषिकेशने शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, शेअर मार्केटमध्ये मंदी आल्याने ऋषिकेश नैराश्यात गेला होता. लोकांपासून लाखो रुपये घेतल्याने पैसा कसा परत करावा? या चिंतेत ऋषिकेश होता. नैराष्यातून त्याने आपल्या कुटुंबातील आई-वडील आणि लहान बहिणीच्या जेवणातही विष कालवले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.