अंबाबाईकडे शक्ती मागायला आलोय : सोमय्या
कोल्हापूर : खरा पंचनामा
हसन मुश्रीफ यांच्या घर, कार्यालयावर ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसने किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरात आगमन झाले. रेल्वे स्थानकावर त्यांनी पोहोचताच माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काही मंत्र्यांवर कारवाई झाली आहे, काहींवर होत आहे, म्हणून अंबाबाईकडे शक्ती मागण्यासाठी आलो आहे.
सोमय्या म्हणाले, कारवाई झाल्यानंतर हसन मुश्रीफांना धर्म आठवला. मात्र, आता कारवाई सुरु झाली आहे. मोदी सरकारवर कोणी घोटाळेबाज दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कोणी प्रभाव पाडू शकत नाही.
मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या दौऱ्याला कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, असे आवाहन केलं आहे. दरम्यान, माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घर, कार्यालयावर ईडीच्या छापेमारीनंतर गेल्या पाच दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
हसन मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या असा सामना रंगला असतानाच रविवारी थेट व्हिडिओ व्हायरल करत किती छापेमारी किती मोठे षड्यंत्र होते, याचा हा 'धडधडीत पुरावा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी 33 सेकंदाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करताना किरीट सोमय्या हे कशा पद्धतीने मोहीम यशस्वी झाल्याचे सांगत आहेत हे दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
दुसरीकडे मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच आता समर्थकही आता आक्रमक झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.