Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाविकास आघाडी विधानपरिषद निवडणूक एकत्र लढविणार!

महाविकास आघाडी विधानपरिषद निवडणूक एकत्र लढविणार!



मुंबई : खरा पंचनामा

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीचा महाविकास आघाडीचा तिढा अखेर सुटला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली, या बैठकीत पाच जागांसाठीचा मार्ग काढण्यात आला. आगामी विधानपरिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती आणि नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार, तर कोकणात शेतकरी कामगार पक्षाचा, नागपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे. अमरावती विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून धीरज लिंगाडे यांचं नाव निश्चित झालं आहे. तर नाशिकमधून काँग्रेसचेच सुधीर तांबे पदवीधर मतदारसंघातून रिंगणात आहेत. 

सुरूवातीला नागपूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यास काँग्रेस तयार नव्हती, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला होता. एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही एक पाऊल जरी मागे आलो असलो तरी आम्ही विचारधारेच्या विरोधात एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही एक पाऊल जरी मागे आलो असलो तरी आम्ही विचारधारेच्या विरोधात आहोत, असं नाना पटोले म्हणाले आहेत. दुसरीकडे भाजप- शिंदे गटही विधानपरिषदेच्या जागा एकत्र लढणार आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांची घोषणा केली. कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिकबद्दलचा निर्णयाची अजून घोषणा झालेली नाही, तर नागपूरमध्ये भाजप प्रणित ना गो नाणार हे लढणार हे निश्चित झालं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.