सांगली, मिरजेतील 14 पाणी कनेक्शन तोडले
सांगली : खरा पंचनामा
पाणी बिलाच्या थकबाकीपोटी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून शुक्रवारी एकाच दिवसात 14 पाणी कनेक्शन तोडली आहेत. या कारवाईच्या भीतीने एकाच दिवसात 11 लाख
26 हजार 943 वसुलीही झाली आहे. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या सुचनेनुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या आदेशाने ही कारवाई सुरू आहे.
शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने सहायक आयुक्त नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत थकीत पाणीपट्टी पोटी रोख 5 लाख 10 हजार तर चेक स्वरूपात 5 लाख 58 हजार वसुली केली आहे. मिरजेत रोख 63280 इतकी थकबाकी वसुली झाली असून 3 पाणी कनेक्शन थकबाकी पोटी तोडण्यात आली आहेत. शुक्रवारी एका दिवसात सांगली मिरज आणि कुपवाड शहरात 11 लाख 26 हजार 943 ची वसुली झाली आहे.
सांगली, कुपवाड मध्ये 11 पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहेत त्याची थकबाकी 2 लाख 75 हजार इतकी होती तर मिरजेत 3 कनेक्शन 47 हजाराच्या थकबाकी पोटी तोडण्यात आली आहे. या कामी पाणी पुरवठा विभागाचे सहायक आयुक्त नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत पाणी पुरवठा अधीक्षक सचिन सागवकर आणि मिरजेत पाणीपुरवठा अधीक्षक दशरथ शिस्टे यांच्यासह टीमने सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.