Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पी. चिदम्बरम यांच्या पत्नीची कोट्यवधीची संपत्ती जप्त

पी. चिदम्बरम यांच्या पत्नीची कोट्यवधीची संपत्ती जप्तनवी दिल्ली : खरा पंचनामा

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीनं मोठा झटका दिला आहे. शारदा चीट फंड घोटाळाप्रकरणी त्यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. याचबरोर इतरही अनेक मान्यवरांच्या जवळच्या नातेवाईकांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे.

"पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम, सीपीएमचे माजी आमदार देवेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी मंत्री अंजान दत्ता यांच्या कंपनीची एकूण सहा कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे"

"पीएमएलए कायद्यांतर्गत कोर्टानं ३.३० कोटी रुपयांची चल संपत्ती आणि तीन कोटी रुपयांची अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपत्तींवर इतर लोकांची मालकी होती. जी शारदा समुहानं फसवून ताब्यात घेतली आहे.

या संपत्तीच्या लाभार्थीमध्ये नलिनी चिदंबरम, देवव्रत सरकार (ईस्ट बंगाल क्लबचे अधिकारी), देवेंद्रनाथ बिस्वास (माजी आईपीएस अधिकारी आणि माजी सीपीएम आमदार), अनुभूती प्रिंटर आणि प्रकाशन यांचा समावेश आहे. अनुभूती प्रिंटर आणि प्रकाशन कंपनीचे मालकी हक्क आसामचे माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्षपद दत्ता यांच्याकडं होतं.

शारदा चीट फंड मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण सन २०१३ पर्यंत पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये शारदा समुहाद्वारे कथीत चीटफंड घोटाळ्याशी संबंधित आहे. ईडीनं म्हटलं की, या समुहाच्या कंपनीद्वारे जमवण्यात आलेली एकूण संपत्ती २,४५९ कोटी आहे. यामध्ये जवळपास १,९८३ कोटी रुपये जमाकर्त्यांना अद्याप द्यायचं आहे. ईडीनं याप्रकरणी आत्तापर्यंत ६०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.