Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!पुणे : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच मी अजित पवारांबरोबर शपथविधी घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं होतं. आजही त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आणखी गौप्यस्फोट केला आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असच जणू काही त्यांना त्यातून म्हणायचं होतं.

फडणवीसांच्या त्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक त्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्व घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, मी अजून अर्धच बोललो आहे. दुसरी योग्य वेळ आल्यास उरलेलं जे काही आहे, ते सांगेन, असे फडणवीस म्हणाले आहेत.

ते म्हणाले, "मी एवढंच सांगेन की, मी जे काही बोललो आहे, ते सत्य बोललो आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका. म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय - काय बोललो आहे, तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसऱ्या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही.

पण मी अजून अर्धच बोललो आहे. उरलेल जे काही अर्ध आहे, ते दुसरी योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धदेखील बोलेल, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय फडणवीस आणखी काय बोलणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.